देशभरातील 32 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाचे (एमसीआय) निकष पूर्ण न केल्याने देशभरातील 32 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता धोक्‍यात आली आहे. यात मुंबईतील टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.

सोई-सुविधा, बांधकामे, रुग्णांची संख्या या निकषांवर "एमसीआय'च्या अधिकाऱ्यांनी देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी दिल्या. त्यापैकी 32 वैद्यकीय महाविद्यालयांनी निकष पूर्ण केलेले नाहीत.

राज्यातील मुंबईतील टिळक रुग्णालयासह तळेगावच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन एन्ड सायन्स, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लातूरमधील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड रिसर्चचा यात समावेश आहे. टिळक रुग्णालयाची मान्यता धोक्‍यात आल्याने याबाबत माहिती देताना महापालिका प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, विद्यार्थ्यांची वाढवलेली संख्या लक्षात घेऊन आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही भरती होत असल्याने त्यापूर्वी या सुविधा रुग्णालय प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील.

Web Title: medical college permission danger