कारवाईच्या भीतीने मेडिकलचालकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये स्टिंग ऑपरेशनद्वारे गर्भपाताच्या गोळ्यांचा पर्दाफाश झाला असतानाच, 22 मार्चला ठाणे अन्न व औषध प्रशासनाने धन्वंतरी मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी दुकानचालकासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून, शनिवारी रात्री पुन्हा या दुकानावर कारवाई केली असता, अटकेच्या भीतीने मेडिकलचालक महेश किंगर याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कॅंप नंबर 1 मध्ये असलेल्या धन्वंतरी मेडिकल स्टोअर्समध्ये गर्भपातावरील औषधांची बेकायदा खरेदी, साठवणूक व विक्री केली जात होती.

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये स्टिंग ऑपरेशनद्वारे गर्भपाताच्या गोळ्यांचा पर्दाफाश झाला असतानाच, 22 मार्चला ठाणे अन्न व औषध प्रशासनाने धन्वंतरी मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी दुकानचालकासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून, शनिवारी रात्री पुन्हा या दुकानावर कारवाई केली असता, अटकेच्या भीतीने मेडिकलचालक महेश किंगर याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कॅंप नंबर 1 मध्ये असलेल्या धन्वंतरी मेडिकल स्टोअर्समध्ये गर्भपातावरील औषधांची बेकायदा खरेदी, साठवणूक व विक्री केली जात होती. कारवाईनंतरही पुन्हा विक्री सुरूच असल्याची माहिती मिळाल्याने पुन्हा कारवाई करण्यात आली. ही बाब बाजूच्याच इमारतीतील किंगर याला कळताच, त्याने गळफास घेतला. 

Web Title: Medical man suicide due to fear of action