वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानाची दुरवस्था

वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानाची दुरवस्था
वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानाची दुरवस्था

नवी मुंबई : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु वाशीच्या मीनाताई ठाकरे उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. याचसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशनही सध्या रंगू लागले आहे. त्यामुळे या उद्यानाला सध्या डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

उद्यानात दारूच्या बाटल्यांचा ढीग पडला असून, अनेक दिवसांपासून वाढलेले गवत काढले नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे उद्यानावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे आकडे दाखवले जातात; तर दुसरीकडे ‘स्वच्छ भारत अभियाना’चे धडे गिरविणाऱ्या पालिकेला मात्र उद्यानातील कचऱ्याचे ढीग उचलण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे येथील मद्यपींचा तातडीने बंदोबस्त करून, उद्यानाची तातडीने साफसफाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आला आहे. 

उद्यानात सीसी टीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी; तसेच पोलिस गस्त वाढवावी, म्हणजे गैरप्रकारांना आळा बसेल, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस गोविंद साळुंखे यांनी केली आहे. याशिवाय उद्यानातील संरक्षण भिंतीला लावलेल्या सुरक्षा जाळ्यादेखील गर्दुल्ल्यांकडून तोडण्यात आल्या आहेत. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानात वाढदिवस साजरे करून खाद्यपदार्थाची रिकामी पाकिटे व इतर कचरा तसाच टाकून निघून जातात. मात्र, उद्यानातील सुरक्षारक्षक याबाबत कडक भूमिका घेत नसल्याने, उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

मुलगा उद्यानात खेळायला गेला होता. त्याच्या पायात काच घुसली. म्हणून उद्यानात आले तर येथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. मुलांना खेळायला कुठे पाठवायचे? उद्यान काय मद्यपींसाठी बांधले आहे का?
- शोभा गायकवाड, नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com