साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा

File Photo
File Photo

ठाणे : बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरियासारखे आजार पसरू नयेत यासाठी आवश्‍यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

राजकीय नेते म्हणजे केवळ यंत्रणांना आदेश देणारे असे सर्वसाधारण चित्र असताना शनिवारी बदलापूर, वांगणी परिसरातील पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एकनाथ शिंदे यांना स्वतः पाण्यात उतरून, दिवसभर मदतकार्यात स्वतःला वाहून घेतलेले पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

तसेच शिंदे यांनी महालक्ष्मी एक्‍स्प्रेसच्या प्रवाशांशी संवाद साधत त्यांना गाडीबाहेर येण्यास राजी केले, तसेच एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि नौदलाच्या बोटींमधून बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप या परिसरातील कानाकोपऱ्यांत पोहोचून तिथे अडकलेल्या नागरिकांची स्वतःच्या देखरेखीखाली सुटका केली. 

केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे, तर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मजबूत फळी घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे मदतकार्यात उतरले. 
जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक महापालिका व नगर परिषदांशी सल्लामसलत करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राधास्वामी सत्संग आश्रम, तसेच लक्ष्मी मंगल कार्यालय येथे तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, पोलिस उपायुक्त अमित काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूरचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव, तुकाराम म्हात्रे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड यांच्या सोबत शिवसैनिकांनी मदतकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com