सलमानला भेटण्यासाठी मध्य प्रदेशातून मुंबईत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - अभिनेता सलमान खानला भेटण्यासाठी मध्य प्रदेशमधून मुंबईत आलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. घरातून पळून आलेली ही मुलगी वांद्रे येथील सलमान राहत असलेल्या गॅलेक्‍सी अपार्टमेंटच्या बाजूच्या बंगल्यात शिरली असता तेथील सुरक्षा रक्षकाने तिला पोलिसांच्या हवाली केले. एक दिवस डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आल्यानंतर बुधवारी तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. 

भोपाळमध्ये राहणारी पलकने (बदललेले नाव) रविवारी घरातून पलायन केले. मंगळवारी ती मुंबईत आली. सलमान राहत असलेल्या इमारतीच्या बाजूला असलेल्या बंगल्यात शिरल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकाने तिला पाहिले. त्याने वांद्रे पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पलकजवळील कागदपत्रांच्या तपासणीत तिची ओळख पटली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. मध्य प्रदेश पोलिसांनी ती माहिती पलकच्या नातेवाइकांना दिली. 

मी सलमानची चाहती असून त्याला एकदा तरी पाहता यावे, यासाठी मुंबईला आल्याचे पलकने पोलिसांना सांगितले. बुधवारी पलकचे पालक मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे तिचा ताबा दिला. 

Web Title: Meet Salman from Madhya Pradesh