मुंबई : महाविकास आघाडीतल्या समन्वयाबाबत आज शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ठाकरे स्मारकात ही महत्त्वाची बैठक पार पडली. संध्याकाळी पाच नंतर ही बैठक सुरु झाली. ही बैठक साधारण एक तास ते सव्वा तास सुरु होती.
राज्यात लाॅकडाऊन वाढवल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासकिय अधिकार्यांच्या धोरणानुसार हा निर्णय घेतला. नागरीकांना 2 किलोमीटरचे बंधन घातल्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मत शरद पवारांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं गेलंय. सोबतच ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीमधील कडकडीत लॉकडाऊन सौम्य करण्याच्या सूचना पवारांनी ठाकरेंना दिल्याची माहिती मिळतेय.
या सर्व गोष्टींचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि लोकांच्या जनजीवनावर होत असल्याची भावना पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्याचं समजतंय. केवळ प्रशासकीय अधिकारी जे सांगतायत तेच योग्य नसून लोकप्रतिनिधी यांच्याकडून आलेली माहिती देखील महत्त्वाची असते आणि जनतेच्या प्रश्नांची त्यांनाच उत्तरं द्यावी लागतात. म्हणून त्यांना देखील विश्वासात घेतलं पाहिजे ही सूचना शरद पवारांनी केल्याची माहिती समजतेय.
आजच्या या बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 जागाच्या बाबतीत देखील चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यात पीककर्जवाटप आणि बोगस बियाणे यावरही सरकारला काही महत्वाच्या सूचना शरद पवार यांनी केल्या असल्याचं बोललं जातंय.
meeting between sharad pawar and cm uddhav thackeray finished read full story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.