गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन
गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन

गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन 

मुंबई ः सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे 19 नोव्हेंबरला महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गृहनिर्माण संस्थांसंदर्भातील अनेक जाचक नियम व क्‍लिष्ट कायद्यांचे विश्‍लेषण अधिवेशनात करून संस्थांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. 

महाअधिवेशनाला राज्यातून पाच हजार संस्थांना आमंत्रित केल्याची माहिती अधिवेशन प्रमुख राहुल पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुखदेखील अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. गोरेगावच्या नेस्को मैदानावर 19 नोव्हेंबरला सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत अधिवेशन होईल. अधिवेशनात सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांवर विचारमंथन करून ते सोडवण्यासाठी सरकारकडे सहकार भारतीतर्फे पाठपुरावा केला जाणार आहे. या बरोबरच सहकार कायद्यातील जाचक अटींबाबत सरकारने फेरविचार करावा याबाबतही ठराव केला जाणार आहे.

अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त सतीश सोनी, रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे, राष्ट्रीय महामंत्री प्रा. डॉ. उदयराव जोशी, राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, तसेच गृहनिर्माण संस्था या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाला गृहनिर्माण व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com