दुष्काळी परिस्थितीबाबत शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

- आज रात्री आठ वाजता होणार उभय नेत्यांमध्ये चर्चा.

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेणार आहेत.

शरद पवार यांनी राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केली. या पाहणीनंतर सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांकडून विविध समस्या मांडण्यात आल्या. या समस्या समजून त्याकडे लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी आवश्यक ते निर्णय घ्यावेत, यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली. 

या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ मागितली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून शरद पवार यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली असून, रात्री 8 वाजता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. 

Web Title: Meeting with Sharad Pawar and Devendra Fadnavis on Drought Situation