ब्‍लॉकमुळे ट्रान्सहार्बरवर मेगाहाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

ठाणे - ठाणे-वाशी-नेरूळ व पनवेल या मार्गावर आधीच मर्यादित लोकल असताना ऐन गर्दीच्या वेळी तीन गाड्या रद्द करून घेण्यात आलेल्या विशेष ट्रॅफिक ब्लॉकचा या मार्गावरील प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दीड तास गाडी नसल्याने फलाटावर ताटकळत उभे राहावे लागले; तर काहींनी कुर्लामार्गे जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम केल्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही ताण आला.

ट्रान्सहार्बर मार्गावरील सर्व गाड्या गर्दीने खचाखच भरल्या होत्या. आधीच उन्हाळा आणि त्यात खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवेबद्दल संताप व्यक्त केला. मध्य रेल्वेने ठाणे स्थानकातून नवी मुंबईच्या दिशेना जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दुपारी विशेष ट्रॅफिक ब्लॉकची घोषणा केली होती. दुपारी १२.३५ वाजल्यापासून ते १२.०५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर प्रत्येक अर्ध्या तासाने लोकल धावत असल्याने गर्दी झाली. ब्लॉकमुळे येणाऱ्या-जाणाऱ्या तीन गाड्या रद्द केल्याने दुपारच्या वेळेत कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागला. काहींनी स्थानकात थांबून येणाऱ्या गाड्यांची वाट पाहत एक ते दीड तास घालवला. प्रवाशांचे जथेच्या जथे गाडी पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

आजचा ब्लॉक शनिवारी...
ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केल्यानंतर गुरुवारी पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले; मात्र शुक्रवारी होणारा ट्रॅफिक ब्लॉक डॉ. बाबासाहेब आंबेकडर जयंतीनिमित्त रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. हे काम शनिवारी होणार आहे. शनिवारी दुपारी या काळात सहा फेऱ्या रद्द होणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: Mega block