उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

रेल्वेच्या मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : रेल्वेच्या मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी, 20 ऑक्‍टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, हार्बरवर पनवेल-वाशी; तर पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गवर ब्लॉकची कामे करण्यात येणार आहेत. परिणामी या रविवारी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. 

मध्य रेल्वे 

कुठे : मुलुंड-माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर 

कधी : सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत 

परिणामी : मुलुंड-माटुंगादरम्यान सर्व अप जलद लोकल अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मेल/एक्‍स्प्रेस आणि लोकल सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तसेच दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत धावणार असून तिथूनच रवाना होईल. यासाठी दुपारी 3.40 वाजता दादरहून विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. 

हार्बर रेल्वे 

कुठे : पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान 

कधी : सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत 

परिणामी : बेलापूर/पनवेल - सीएसएमटी अप-डाऊन मार्ग, पनवेल-अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-पनवेल मार्गावरील लोकल बंद असणार आहे. दरम्यान, सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-नेरूळ विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. 

पश्‍चिम रेल्वे 
कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल धीम्या मार्गावर 

कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत 

परिणामी : ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablock on all three lanes tomorrow