मंकी हिल-कर्जतदरम्यान दहा दिवसांचा ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

मध्य रेल्वेवर मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी ‘अप’ मार्गावर गुरुवारपासून (ता. २४) १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येईल

मुंबई : मध्य रेल्वेवर मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी ‘अप’ मार्गावर गुरुवारपासून (ता. २४) १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली असून, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे. काही गाड्यांच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. 

ब्लॉकदरम्यान २४, २५, २६, २७, ३१ ऑक्‍टोबर आणि १ नोव्हेंबरला सीएसएमटी-पंढरपूर-सीएसएमटी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात येईल. सीएसएमटी-बिजापूर-सीएसएमटी एक्‍स्प्रेस, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्‍स्प्रेस आणि पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या गाड्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

भुसावळ-पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस ३१ ऑक्‍टोबरपर्यंत दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे. सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्‍स्प्रेस, हुबळी-एलटीटी-हुबळी एक्‍स्प्रेस, हैदराबाद -सीएसएमटी-हैदराबाद एक्‍स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेस, नांदेड-पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेस आणि पनवेल-नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेस या गाड्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत पुण्यापर्यंतच चालवण्यात येतील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: megablock between karjat and monkey hill