कल्याण-ठाणे मार्गावरील मेगाब्लाॅक रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

हा ब्लाॅक सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 3.50 वाजेपर्यंत होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : कल्याण-ठाणे अप जलद मार्गावरील मेगाब्लाॅक मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आला आहे.

हा ब्लाॅक सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 3.50 वाजेपर्यंत होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे.

तर, हार्बर मार्गावरील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-चुना भट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत आणि चूनाभट्टी / वांद्रे - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत नियोजित मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablock on Kalyan Thane route is cancelled in Mumbai