मेगाब्लॉकमुळे रविवारी कल्याणनंतर प्रवास खडतर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द
मुंबई - देखभाल व दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 22) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण ते टिटवाळादरम्यान मेगाब्लॉक असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द
मुंबई - देखभाल व दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 22) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण ते टिटवाळादरम्यान मेगाब्लॉक असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

याकारणाने रविवारी कल्याणच्या पुढचा प्रवास कटकटीचा ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या शेलू ते कर्जत स्थानकादरम्यान शनिवार आणि रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहेत. दोन्ही दिवशी दोन तासांचेच दुरुस्तीचे काम होणार असले, तरी त्याचा परिणाम लोकल सेवेवर होणार आहे. या काळातील सहा लोकल बदलापूर व अंबरनाथपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चेन्नई व हैदराबाद एक्‍सप्रेस या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येतील.

शहाड स्टेशनजवळची जलवाहिनी क्रेनच्या मदतीने काढण्यासाठी रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कल्याण ते टिटवाळा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ठाण्याहून सकाळी 8.59 वाजल्यापासून व सीएसएमटीवरून सकाळी 11.08 वाजल्यापासून सुटणाऱ्या टिटवाळा लोकल रद्द करण्यात येणार आहेत. आसनगावहून सकाळी 9.12 आणि टिटवाळ्याहून दुपारी 12.21 वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 12110 व 12109 पंचवटी आणि गाडी क्रमांक 12118 व 12117 गोदावरी एक्‍सप्रेस धावणार नाही, असे रेल्वेने कळवले आहे. मुंबईहून निघणाऱ्या हावडा सुपरफास्ट, नागपूर सेवाग्राम, पाटलीपुत्र एक्‍सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. तर मुंबईत येणाऱ्या हावडा एक्‍सप्रेस, सेवाग्राम, महानगरी, राजेंद्रनगर, वाराणसी, हटिया, अलहाबाद, पाटलीपुत्र, जालना-दादर जनशताब्दी एक्‍सप्रेस दोन तास उशिरा अपेक्षित आहेत.

हार्बर रेल्वेमार्गावरील नेरूळ ते पनवेल दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. नेरूळ ते पनवेल-बेलापूर दरम्यान सकाळी 11.01 ते 4.26 वाजेदरम्यान आणि पनवेल-बेलापूर ते सीएसटी दरम्यान सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 वाजेदरम्यान लोकलसेवा पूर्णपणे बंद असेल. ट्रान्सहार्बर मार्गावर नेरूळ ते पनवेल/बेलापूर दरम्यान सकाळी 11.42 वा. ते दुपारी 4.04 वाजेदरम्यान आणि पनवेल/बेलापूर ते ठाणे दरम्यान दुपारी 11.04 ते दुपारी 3.53 वाजेदरम्यान लोकल रद्द असतील. पनवेल ते अंधेरी सेवाही चालवण्यात येणार नाही.

पश्‍चिम रेल्वेमार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात धीम्या लोकल बोरिवलीपासून वसई रोड/ विरारपर्यंत जलदमार्गावर वळवण्यात येतील.

Web Title: megablock kalyan to titwala