
Mega Block : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कुठे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.
कुठे - कुर्ला येथे पादचारी पुलाच्या प्लेट गर्डर्स लाँच करण्यासाठी शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत
विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे
कधी - रात्री ११.५० ते ४. २० (४ वाजून ३० मिनिटे) अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावर
परिणाम - वडाळा रोड ते मानखुर्द या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे १४० टी रेल्वे क्रेन वापरून कुर्ला स्थानकावर ८ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्डर सुरू करण्यासाठी अप जलद मार्गावर आणि डाऊन हार्बर मार्गावर रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल.ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत.
डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल पनवेल हि सीएसएमटीवरून रात्री ११. १४ वाजता सुटणार आहे.
अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल पनवेल लोकल ही वडाळा रोडवरून रात्री ११.८ वाजता सुटेल.
पच्छिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक
रविवार, 19 मार्च रोजी पच्छिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
कुठे - वसई रोड आणि भाईंदर स्टेशन दरम्यान
कधी - शनिवारी १८ मार्च आणि रविवारी १९ मार्च च्या मध्यरात्री ११.३० ते मध्यरात्री ३.३० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर
परिणाम - यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल विरार, भाईंदर आणि बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरील धावतील, ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.
मेल/एक्स्प्रेस एक्स्प्रेस गाड्यांना फटका
कोणार्क एक्सप्रेस, हावडा – मुंबई मेल , मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.