तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायर दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

मुंबई - रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायर दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

असा असेल मेगाब्लॉक 
- मध्य रेल्वे 

कधी - सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत 
कुठे - कल्याण ते अंबरनाथदरम्यान ब्लॉक. उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डरचे दुरुस्तीचे काम. 
परिणाम - कल्याण ते बदलापूर लोकल सेवा रद्द. बदलापूर ते कर्जत विशेष लोकल चालवली जाईल. 

- हार्बर रेल्वे 
कधी - सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत 

कुठे - सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गांवर 
परिणाम - वाशी-बेलापूर-पनवेलहून सुटणारी सीएसएमटी आणि वडाळा रोड लोकल, सीएसएमटीहून सुटणारी वाशी-बेलापूर-पनवेल, गोरेगाव आणि वांद्रेदरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला, पनवेल स्थानकातील फलाट क्रमांक आठवरून पनवेलकरिता विशेष लोकल चालवली जाईल. 

- पश्‍चिम रेल्वे 
कधी - सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 

कुठे - सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकातील पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक 
परिणाम - ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द 

- रात्रकालीन ब्लॉक 
कधी - शनिवारी मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत 
कुठे - कल्याण ते टिटवाळा स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक 
परिणामी - शनिवारी मध्यरात्री 12.05 ची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रद्द 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablocks tomorrow on all three routes