'मेमू' मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये दाखल

'मेमू' मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये दाखल

मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली
पहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शहरांना जवळ आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारतर्फे केला जात आहे. दोन शहरांमधील प्रवास वेळेत बचत व्हावी तसेच पर्यावरणाची देखील हानी होऊ नये, यासाठी विविध मार्गावर मेमू चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई ते पुणे, नाशिक आणि बडोदा या तीन महत्वाच्या
मार्गावर लवकरच मेमू गाडी चालविण्यात येणार आहे.

गुरुवारी मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये एक मेमू गाडी
उभी करण्यात आलेली आहे. चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) कारखानातून ही गाडी आलेली आहे. ही गाडी उत्तर रेल्वेची असून या मेमू ट्रेनच्या चाचण्या मध्य रेल्वेच्या अखत्यारितील घाट सेक्शनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ती ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात येणार
असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. मात्र, या मेमू ट्रेनची चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेला देखील मेमू मिळणार असल्याचे देखील उदासी यांनी स्पष्ट केले.

मेमूची वैशिष्टये :

मेमू ट्रेनचे 18 डब्बे असणार आहे. मेमूच्या खालच्या भागात इले्िक्ट्रक यंत्रणा, प्रति तास 130 किमीचा वेग, टॉक बॅक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलची बॉडी, अद्ययावत सीट, प्रवासी डब्यात दोन शौचालय तर ड्रायव्हरच्या मोटर कोचमध्ये एक शौचालय, सामान ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनीअमचे रॅक, सीसीटीव्ही
कॅमेरे, प्रवाशांसाठी उदघोषणा यंत्रणा आणि जीपीएस, सध्याच्या मेमूपेक्षा 97 टक्के प्रवासी क्षमता अधिक, एकूण 2618 प्रवासी (उभे प्रवासी 1874 तर बसून 744 ) प्रवास करु शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com