कोरोनाची दहशत: आता मानसिक आरोग्याचे आव्हान; तणाव दूर करण्यासाठी करा हे उपाय

कोरोनाची दहशत: आता मानसिक आरोग्याचे आव्हान; तणाव दूर करण्यासाठी करा हे उपाय
कोरोनाची दहशत: आता मानसिक आरोग्याचे आव्हान; तणाव दूर करण्यासाठी करा हे उपाय

मुंबई : कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असून अनेक जण नैराश्‍यात जाऊ लागले आहेत. मिरा रोड येथील वोक्‍हार्ड रुग्णालयातील मानसोपचार विभागात महिन्याभरात ओसीडी (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) या आजाराच्या रुग्णसंख्येत 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती डॉ. सोनल आनंद यांनी दिली. 

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेकांना या आजाराची लागण होईल, अशी भीती आहे. डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जसा वाढतोय, तसा नागरिकांच्या वागणुकीवर परिणाम दिसून येत आहे. आर्थिक संकट आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चिंतेपायी अतिप्रमाणात हात धुतले जात आहेत. गरज नसतानाही एखादी गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त करणे, हा एक मानसिक आजार आहे. वैद्यकीय भाषेत त्याला "ओसीडी' असे म्हणतात. या रुग्णांमध्ये आता वाढ होताना दिसून येत आहे. 

डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले की, संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा आहे. भारतातही आता रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे आपल्यालाही या आजाराची लागण होईल, अशी भीती अनेकांना सतावू लागली आहे. त्यातून नैराश्‍य वाढत आहे. त्यामुळे सध्या मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महिन्याभरात नैराश्‍य आणि ओसीडी (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) या आजाराच्या रुग्णसंख्येत 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ आहे. हा मंदगतीने वाढणारा मानसिक आजार आहे. या मनोविकारात व्यक्ती अती स्वच्छता पाळतात. त्यांना भीती असते की आपल्याला जंतुसंसर्ग होईल, त्यामुळे आपल्याला त्रास होईल, या भीतीने व्यक्ती काळजी घेत असते; यात वारंवार हात धुणे, आंघोळ करणे, कपडे बदलणे, वारंवार वस्तूंची तपासणी करणे, अशी लक्षणे या लोकांमध्ये दिसून येत आहेत. याशिवाय बहुतेक रुग्णांमध्ये उदासीनता, बेचैनी, काम करायला कंटाळा येणे, खूप वेळ विचार करण्यात घालवणे, नैराश्‍य अशा तक्रारी घेऊन येत आहेत. असे असताना अनेकांना मानसिक आजार झाला आहे, याची जाणीवही झालेली नसते. 
 
मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करावे? 
-
दिवसभरात काय काम करायचे आहे, याचा आराखडा तयार करा. 
- नियमित व्यायाम करा. 
- हात किती वेळा धुवावेत, याकडेही लक्ष द्या. 
- संसर्ग टाळण्यासाठी आपण हात धुवत आहोत की आपल्या समाधानासाठी. हेसुद्धा पाहा. 
- सोशल मीडियापासून दूर राहून टीव्हीवरील मनोरंजनपर कार्यक्रम पाहा. 
- समाजमाध्यमाच्या ग्रुपवर कोरोनाची चर्चा होत असल्यास त्यातून बाहेर पडा. 
- मानसिक आरोग्याबाबत तक्रारी असल्यास तातडीने मानसोपचारतज्ज्ञांना संपर्क साधा. 
 
हे ही वाचा...
घरखर्चासाठी पत्नीचे दागिने गहाण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com