मानसिक आजार हे अपंगत्व नाही - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - शिकण्यातील अडचणी किंवा अन्य प्रकारचा संबंधित मानसिक आजार म्हणजे अपंगत्व नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. "डिसकॅलक्‍युलिया' कमतरतेला अपंगत्वाचे प्रमाण मानण्याची मागणी करणारी विद्यार्थिनीची याचिका न्यायालयाने नामंजूर केली.

मुंबई - शिकण्यातील अडचणी किंवा अन्य प्रकारचा संबंधित मानसिक आजार म्हणजे अपंगत्व नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. "डिसकॅलक्‍युलिया' कमतरतेला अपंगत्वाचे प्रमाण मानण्याची मागणी करणारी विद्यार्थिनीची याचिका न्यायालयाने नामंजूर केली.

आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीने सहा वर्षांपूर्वी न्यायालयात केलेल्या याचिकेवर नुकतीच न्या. एम. एस. संकलेचा आणि न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. "डिसकॅलक्‍युलिया' असलेली याचिकादार विद्यार्थिनी 2012 मध्ये आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेणार होती. मात्र, तिने अर्जामध्ये "डिसकॅलक्‍युलिया' असा उल्लेख केला असून, अपंग कोट्यातून प्रवेश मागितला होता. आयआयटीने प्रवेश नाकारल्यावर तिने न्यायालयात याचिका सादर केली होती. त्या वेळेस न्यायालयाने याचिकादाराला " मास्टर ऑफ डिझाइन प्रोग्राम' अभ्यासक्रमासाठी सशर्त प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते आणि याचिकेच्या अंतिम निर्णयावर तिच्या निकालाचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले होते. संबंधित याचिकादार मुलीने तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मात्र, तिला अधिकृत पदवी महाविद्यालयाकडून मिळालेली नाही. आयआयटीच्या युक्तिवादानुसार "डिसकॅलक्‍युलिया' हा आजार शिकण्याशी संबंधित आहे. गणितीय प्रश्‍नांवर यामध्ये अधिक परिणाम होत असतो. मात्र, अपंगत्वाच्या व्याख्येत हा आजार येऊ शकत नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. मेंदूची पुरेशी वाढ न झाल्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये आणि "डिसकॅलक्‍युलिया'मध्ये फरक आहे. त्यामुळे या आजाराला अपंगत्व म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच यापुढे याचिकादार विद्यार्थिनीला या निकषावर प्रवेश न देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: Mental illness is not a disability high court