सोन्याचे बनावट बिस्कीट देऊन व्यापाऱ्याची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भामट्या दुकलीची करामत

उल्हासनगर - येथील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भामट्या दुकलीने 100 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन एका मेडिकल व्यापाऱ्याला तब्बल तीन लाख रुपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे. या जोडीला पोलिसांनी अटक केली आहे. 

हेही वाचा - खुशखबर मेट्रो प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात

कॅम्प नं. 4 येथील कुर्ला कॅम्प परिसरात त्रिमूर्ती केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट मेडिकलचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी मेडिकलचे मालक नरेंद्र वारूळे हे दुकानात बसले असताना त्यांच्या तोंडओळखीचा उदयभान पांडे व त्याच्या सोबत काळ्या रंगाचा तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला आफ्रिन शेख मेडिकलमध्ये आली. त्यांनी 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असल्याचे सांगत या सोन्याच्या बिस्कीटच्या मोबदल्यात तीन लाख रुपये द्या, असे वारुळे यांना सांगितले.

हेही वाचा - कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा

वारुळे यांनी ते बिस्कीट घेऊन तीन लाख रुपये त्या दोघांना दिले असता ते दोघेही पैसे घेऊन पसार झाले. दरम्यान, आरोपीने दिलेले सोन्याचे बिस्कीट हे बनावट असल्याचे वारुळे यांना समजताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी उदयभान पांडे व आफ्रिन शेख या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षल राजपूत व सचिन साळवे यांनी आरोपी उदयभान व आफ्रिन या दोघांचाही शोध घेऊन त्यांना मंगळवारी अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

web title : Merchants got cheated by giving fake gold biscuits

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Merchants got cheated by giving fake gold biscuits

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: