ST News : एसटीचे विलीनीकरण टप्याटप्याने होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

merger of ST will done phased manner Gunaratna Sadavarta video viral on social media

ST News : एसटीचे विलीनीकरण टप्याटप्याने होणार

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेचा फायदा घेत संप चिघळवण्याचे काम आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संप काळात केल्याचे आरोप सर्वत्र केले जात आहे. एका वाक्यात विलीनीकरण लिहून घ्या म्हणणारे आता आता एसटी विलीनीकरण टप्या टप्याने होईल,

त्यामूळे जरा थांबा असा सदावर्ते यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. संपातील खंदे समर्थक समजले जाणारे सचिदानंद पुरी यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केला असून, विलीनीकरणाच्या नावावर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना गुतून ठेवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)ने केला आहे.

डंके की चोट पर, एसटीचे विलीनीकरण होणार अशी घोषणा करणारे सदावर्ते यांनीच आता नविन एसटी कर्मचाऱ्यांची संघटना काढली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन समस्यांवर निवेदन देण्याचे काम करत आहे.

विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्यासाठी आता राहीला नसून, विलीनीकरणावर शक्यतो भाष्य करण्यास टाळत आहे. मात्र, संप काळातील सहकारी कर्मचार्याकडून सदावर्तेंवर वेळोवेळी टिका केली जात आहे.

कोरोना महामारीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणासाठी कनिष्ठ वेतन श्रेणी संघंटनेने संप पुकारला होता. मात्र, प्रत्यक्षात संपाचे स्वयंमघोषीत नेतृत्व सदावर्ते यांनी स्विकारले होते. संपात एसटी कर्मचाऱ्यांना अधिक कालावधीपर्यंत संप सुरू होता.

मात्र, त्यानंतर आता थांबा थांबा जरा थांबा, एक वेळ येईल तेव्हा कष्टकरी भावांनो तुम्ही टप्या टप्याने पुढे जाल, शिस्त आवेदन पद्धत गेली की, अर्धी बिमारी दुर झाली. सातवा वेतन आयोग आला, तर ७५ टक्के सुधार होईल, सहा महिन्यात सरकार पडेल आणि तेव्हा सरकारला समजेल यांचे विलीनीकरण केलेलेच बरे हे काही परवडणारे नाही अशा आषयाचा व्हिडीओ सध्या सदावर्ते यांचा व्हायरल करण्यात आला असून, त्यांच्यावर सर्वेत्र टिका केली जात आहे.

संपात एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवणारे सदावर्तेंचा डाव आता कर्मचारी समजले आहे. याचा परिणाम म्हणजे त्यांचे संपातील सहकारीच त्यांच्या विरूद्ध व्हिडीओ व्हायरल करत आहे. त्यामूळे इतर संघंटनांनी त्यांना विरोध केल्यापेक्षा एक दिवस एसटी कर्मचारीच त्यांना त्यांची योग्य जागा दाखवणार आहे.

-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, एसटी वर्केर्स काँग्रेस (इंटक)