School News : राज्यातील गुणवंत शाळांचा लेखाजोखा झाला प्रसिद्ध

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी इतर शाळांनी प्रेरणा घेण्याचे केले आवाहन
meritorious schools in state was released Deepak Kesarkar education mumbai
meritorious schools in state was released Deepak Kesarkar education mumbai sakal

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक आणि शाळांनी शालेय गुणवत्तेच्या विकासासाठी अभिवन प्रयोग राबवून एक नवे मार्ग निर्माण केले, त्या शाळांचा लेखाजोखा ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

meritorious schools in state was released Deepak Kesarkar education mumbai
Education: इयत्ता पहिलीत सहाव्या वर्षी प्रवेश

यात अनेक शाळांच्या यशोगाथा त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली असून या सर्व शाळांची राज्यातील इतर शाळांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.

समग्र शिक्षा अभियानाने संकलित केलेल्या 'गुणी शिक्षक, गुणवंत शाळा' या पुस्तिकेच्या पहिल्या आवृत्तीचे केसरकर यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन झाले यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

meritorious schools in state was released Deepak Kesarkar education mumbai
Education Sector on Budget 2023 : शिक्षण क्षेत्रात कही खुशी, कही गम’; मान्यवरांच्या प्रतिक्रिया

राज्यातील ६५,६३९ शासकीय शाळांमधील हजारो शिक्षक उत्तम शैक्षणिक कामगिरी करीत आहेत. मात्र, प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई उपनगरातील एक मनपा शाळा आणि उर्वरित ३४ जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे एकूण ३५ लेख या पुस्तकात संकलित केले आहेत.

शाळेतूनच आपले मूल गुणवंत होऊन बाहेर पडेल, या विश्वासाने पालक आपले मूल शिक्षकांच्या हाती सोपवतात. पालकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिक्षकही सातत्याने प्रयत्न करतात. त्यांची ही धडपड म्हणजेच गुणवत्तेकडे वाटचाल करणारा त्यांचा खडतर प्रवास आहे. हा प्रवास शिक्षकांनी आपल्याच शब्दात या लेखांमध्ये मांडला आहे.

यावेळी केसरकर यांनी राज्यातील शिक्षक आणि शाळांमधील नावीन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक आणि शाळांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे म्हणाले की, राज्यातील सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी अनेक अभिनव असे प्रयोग सुरू आहेत. शिक्षक त्यासाठी खूप परिश्रम करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेकांनी झोकून दिले आहे. त्यातील काही प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या या उपक्रमांप्रमाणेच असे असंख्य नावीन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शाळांमध्ये सुरू आहेत. यामुळे शासकीय शाळांना चांगला लोकसहभागही मिळत आहे. गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण यातून अपेक्षित आहे.

'निपुण महाराष्ट्र' उपक्रमातूनही असंख्य माता गट स्थापन करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग आम्ही वाढवीत आहोत, असे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. शाळेत गुणवत्तेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी 'गुणी शिक्षक, गुणवंत शाळा' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीतील लेख खूपच उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुणवत्तेचा प्रसार व्हावा..

शाळा म्हणजे बालकांच्या सर्वागीण विकासाचे ठिकाण असते, शाळेच्या वर्गात देशाचे भविष्य घडते. ग्रामीण, दुर्गम विद्यार्थी घडविण्याचे गुरूजनांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. शिक्षकांचा खडतर वाटेवरील हा आशादायक प्रवास सर्वांसमोर यावा, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने समग्र शिक्षा व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com