
वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सतत गुरांची धडक होत आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर येणाऱ्या गुरांच्या बंदोबस्तासाठी आता पश्चिम रेल्वेने ६२० किलोमीटर रेल्वे मार्गावर तारेचे कुंपण उभारण्यात येत आहे.
Railway : रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांना रोखण्यासाठी धातूंचे अडथळे
मुंबई - वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सतत गुरांची धडक होत आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर येणाऱ्या गुरांच्या बंदोबस्तासाठी आता पश्चिम रेल्वेने ६२० किलोमीटर रेल्वे मार्गावर तारेचे कुंपण उभारण्यात येत आहे. या कामाकरिता पश्चिम रेल्वेने आतापर्यत ८ निविदा मंजूर झाल्या असून काम जोरात सुरू आहे. हे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहेत. या कुंपणासाठी २६४ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान अत्याधुनिक - हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून सुरू केली होती. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यात चार अपघात झाले आहे. या चारही अपघातात वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचा समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच अपघातामुळे प्रवासी सुरक्षा ऐरणीवर आला होता.
आता गुरांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गावर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता प्रत्येक्षात कुंपण घालण्याचे काम सुरु झाले आहे. हे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुमारे ६२२ किमी लांबीचे धातूंचे कुंपण बांधले जाणार असून त्याला अंदाजे २४५. २६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या सर्व ८ निविदा मंजूर झाल्या असून काम जोरात सुरू आहे. हे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.
६२० किलोमीटर मार्गावर कुंपण -
हे कुंपण स्टेनलेस स्टीलचे असणार आहे. जमिनीपासून १.५ मीटर उंचीवर ‘डब्ल्यू-बीम’ स्ट्रक्चर असणार आहे. या कुंपणमुळे रेल्वे मार्गावर गुरे आणि प्रवासी सुद्धा रेल्वे रूळ ओलांडता येणार नाही. सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सरासरी १३० टक्के व्याप्तीसह चालत आहे आणि प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.