मेट्रो 3 चा पहिला कोच मुंबईत दाखल 

मेट्रो 3 चा पहिला कोच मुंबईत दाखल 

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या भूमिगत मेट्रो 3 मार्गाचा पहिल्या डमी-मॉडेल (मॉक) डबा (कोच) मुंबईत दाखल झाला आहे. ऑगस्टमध्ये, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासह एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोलिंग स्टॉकचे स्केल मॉडेलचे अनावरण केले होते. याच कार्यक्रमात, या डब्याला लाईन 3 चा एक्वा लाईन म्हणून नामकरण करण्यात आले होते. हा एक्वा लाईन मॉक कोच आता मुंबईत दाखल झाला आहे. 

मुंबई शहराचा अविभाज्य भाग असलेल्या समुद्राच्या प्रवाहाद्वारे प्रेरित म्हणून एक्वा लाईन या ट्रेनच्या मॉक कोचचे अनावरण करण्यात आले. मेट्रो 3 च्या कोचमध्ये असलेल्या प्रगत वैशिष्ट्यांची झलक पाहायला मिळणार आहे. मुंबईसाठी नवीन, आयकॉनिक आणि एक्‍सक्‍लुझिव्ह डिझाईन या कोचमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉक-अपमध्ये प्रगत वैशिष्ट्यांची झलक मुंबईकरांना पाहता येणार आहे.

या कॉरिडॉरवर 8 कोचच्या एकूण 31 मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, स्मोक डिटेक्‍टर, इमर्जन्सी इंटरकॉम्स, अग्निशमन यंत्रणा अशा सोयीसुविधा या मेट्रो3 कोचमध्ये आहेत. कोचच्या डिझाईनमध्येही व्हीलचेअर आणि सक्षम व्यक्तींसाठी सुलभता आणि सोयी दिल्या आहेत. 

web title : Metro 3  First coach arrives in Mumbai

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com