मेट्रो 6 च्या मार्गाची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मोजणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई - मेट्रो 6 या प्रकल्पाच्या मार्गाची जलद आणि सहज मोजणी करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. स्वामी समर्थ नगर-जोगेश्‍वरी-विक्रोळी असा हा प्रकल्प आहे. त्याची ड्रोन कॅमेऱ्यांनी मोजणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पात्र कंपन्यांकडून 17 एप्रिलपर्यंत निविदा मागवल्या आहेत. 

पूर्व-पश्‍चिम उपनगराला जोडणारा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो 1 प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पूर्व-पश्‍चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी "एमएमआरडीए'ने स्वामी समर्थ नगर-जोगेश्‍वरी-विक्रोळी हा मेट्रो 6 प्रकल्प हाती घेतला आहे. जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडला समांतर असणारा हा मेट्रो मार्ग सुमारे 14.47 किलोमीटर अंतराचा आहे. त्यावर 13 स्थानके प्रस्तावित आहेत. 

"एमएमआरडीए'तर्फे दहिसर-डी. एन. नगर 2-अ, दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व मेट्रो 7, कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 हे प्रकल्प राबवले जात आहेत. तर डी. एन. नगर-बीकेसी-मानखुर्द मेट्रो 2-ब आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 या प्रकल्पांचे काम काही महिन्यांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. हे प्रकल्प मार्गी लागत असताना "एमएमआरडीए'ने मेट्रो 6 प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. कंपन्यांना 17 एप्रिलपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. 

कामाचे स्वरूप 
मेट्रो मार्गावरील स्थानकाचे सर्वेक्षण, सीमांकन करणे, झाडांचे प्रकार-उंची-बुंध्याचा व्यास, बांधकामांची तपशीलवार माहिती जमा करण्याचे काम करावे लागणार आहे. हे काम कंपनीला 40 दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. 

Web Title: Metro 6 by way of the measurement camera drone