खुशखबर! मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

‘मेट्रो-२ अ’ आणि ‘मेट्रो-७’ या प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपर्यंत या मार्गांवरून वाहतूक सुरू होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. एमएमआरडीएने मंगळवारी (ता. ३) या प्रकल्पांबाबत घेतलेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.

मुंबई : ‘मेट्रो-२ अ’ आणि ‘मेट्रो-७’ या प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपर्यंत या मार्गांवरून वाहतूक सुरू होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. एमएमआरडीएने मंगळवारी (ता. ३) या प्रकल्पांबाबत घेतलेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.

ही बातमी वाचली का? कहर! साथीच्या आजारांचा नशेबाज असा उचलतात फायदा 

एमएमआरडीएमार्फत मुंबई आणि लगतच्या भागांत एकूण १३ मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दहिसर पश्‍चिम ते डीएननगर (मेट्रो-२ अ) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो- ७) या मार्गांचे काम सुरू आहे. हे दोन्ही मार्ग सुरू झाल्यावर दररोज १५ लाख ७० हजार नागरिक प्रवास करतील. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असा दावा करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे तब्बल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव

मेट्रो-२ अ मार्ग लिंक रोडवरून आणि मेट्रो-७ मार्ग पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून बांधण्यात येत आहे. या दोन्ही मार्गांचे ९० टक्के काम झाले असून, उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. पॅकेज १ आणि २ मध्ये आठ स्थानके असून, अनुक्रमे ८२.५५ कोटी आणि ९८.१५ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. पॅकेज ३ आणि ४ मध्ये सात स्थानके असून, ९१.०४ कोटी आणि ८५.१२ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे.

ही बातमी वाचली का? सिडकोच्या कामांमधील अनियमितता, फडणवीसांचा पाय खोलात? वाचा कॅगचा रिपोर्ट

मॉल किंवा व्यावसायिक परिससरात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मेट्रो मार्गिका उपयुक्त ठरेल. या मार्गिकेमुळे दोन्हींकडून प्रवास सोईस्कर होईल. 
- आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Metro-A' and 'Metro-3' completed by the end of the year mumbai