मेट्रोची सुनावणी ठाण्यात घेण्यास ग्रामस्थांचा विरोध; अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Metro
MetroSakal Digital

भाईंदर : मेट्रो मार्गिका आणि कारशेड (Metro and carshed) विरोधात मुर्धा, राई आणि मोर्वा गावातील ग्रामस्थांनी नोंदवलेल्या हरकतींवर बाजू मांडण्यासाठी १४ मार्चला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी (thane collector) सुनावणी आयोजित केली आहे; परंतु सुनावणी मिरा भाईंदरमध्ये (Mira-bhayandar) घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुसरीकडे मेट्रोच्या विषयावर विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली असल्यामुळे सुनावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Metro
पक्षाने दिलेली जबाबदारी निभावल्याचा जास्त आनंद - आमदार गणपत गायकवाड

भाईंदरच्या पुढे राई गावापर्यंत वाढवण्यात आलेल्या प्रस्तावित मेट्रो मार्गाला आणि त्याच्या कारशेडला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध सुरू आहे. कारशेडसाठी जमीन संपादनासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेवर सुमारे एक हजाराहून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेण्यासाठी १४ मार्चला सायंकाळी ४ वाजता ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आहे. मात्र, यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. मेट्रोचा विषय मिरा-भाईंदरशी संबंधित आहे. भूसंपादन राई आणि मोर्वा गावातील शेतजमिनींचे होणार आहे. त्यामुळे त्याची सुनावणी ठाण्यात कशासाठी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मेट्रोला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्यामुळे या प्रश्नी विधिमंडळाच्या अधिवेशनात आपण लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. या सूचनेवर सरकारकडून उत्तर येत नाही तोपर्यंत सुनावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हरकती नोंदवलेल्या एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना ठाण्यात बोलावण्याऐवजी प्रशासनाच्या अधिकऱ्यांनी मिरा-भाईंदरला येऊन सुनावणी घेतली तर ते सर्वांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. तशी लेखी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे.
- अशोक पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com