मेट्रो खांबाच्या कामामुळे  वीजपुरवठ्यावर परिणाम?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

मेट्रो-२ अ मार्गावर विक्रोळीतील कामराजनगरमध्ये खांब उभारण्याच्या कामामुळे कांदिवली पश्‍चिम आणि अंधेरी पश्‍चिम भागात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - मेट्रो-२ अ मार्गावर विक्रोळीतील कामराजनगरमध्ये खांब उभारण्याच्या कामामुळे कांदिवली पश्‍चिम आणि अंधेरी पश्‍चिम भागात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टाटा पॉवर आणि अदानी इलेक्‍ट्रिसिटी कंपन्या पर्यायी यंत्रणा वापरून वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचे काम मध्यरात्री केले जाणार असल्याने नागरिकांना त्रास होण्याची शक्‍यता आहे. 

दहिसर ते डीएननगर मेट्रो २ अ मार्गावर कामराजनगरमध्ये खांब उभारण्यात येत आहे. त्यामुळे १३ व १४ जुलै आणि २० व २१ जुलैला मध्यरात्री १२ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी पश्‍चिम परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याची  शक्‍यता आहे. 

पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली, तरी ऐनवेळी अडचणी निर्माण झाल्यास काही काळासाठी वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे टाटा व अदानी वीज कंपन्यांच्या ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात येत असल्याचे एमएमआरडीएचे प्रवक्ता दिलीप कवठकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro pole work impact to Power supply

टॅग्स