माहिम ते दादर पर्यंतचे मेट्रो भुयारीकरण पूर्ण

Metro refillation from Mahim to Dadar is complete
Metro refillation from Mahim to Dadar is complete

मुंबई : माहिम येथील नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले.

एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा - वांद्रे - सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यापूर्वी सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रु) पूर्ण करण्यात आले आहे.

आज दादर येथील शिवसेनाभवन पर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे. कृष्णा 1 आणि 2 या दोन टनेल बोअरिंग मशीन नयानगर लौंचिंग शाफ्ट माहीम येथून अनुक्रमे 21 सप्टेंबर 2017 आणि 18 ऑक्टोबर 2017 ला भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. नयानगर माहिम पासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर 2490 मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा - 1 या टीबीएमसाठी 1779 इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्स चा वापर करण्यात आला.

कृष्णा 2 या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी 2472 मीटर भुयारीकरणासाठी 1766 इतक्या आरसीसी रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा 1 व 2 द्वारे सरासरी दररोज 10 ते 12 मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे.

या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या 100 जणांच्या दोन तुकडीने बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया सारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठलाय. कृष्णा 1 आणि 2 हे हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीचे टीबीएम मशीन आहे व त्याची लांबी 108 मीटर इतकी असून हे प्रत्येकी 400 टन इतक्या वजनाचे आहे.

याप्रसंगी मुं. मे. रे. कॉ. च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, 'आज प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. सध्या सर्व 17 टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि 18 किमी पेक्षा अधिक म्हणजेच एकूण 35 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कामाची गती बघता मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी दिलेल्या वेळेत आम्ही मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत आणू असा विश्वास आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com