मेट्रोची 52 स्थानके "हरित'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबईच्या तीन मेट्रो मार्गांवरील 52 स्थानके ही "हरित' स्थानके म्हणून विकसित होणार आहेत. या सर्व स्थानकांवर पर्यावरणस्नेही सौरऊर्जा, नैसर्गिक ऊर्जा यांचा जास्तीत जास्त वापर केला जाईल, असे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले.

दहिसर ते डी. एन. नगर, दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) आणि डी. एन. नगर ते मंडाले या तीन मेट्रो मार्गांवरील 52 स्थानकांना यासंदर्भातील हरित प्रमाणपत्रही मिळेल. इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या ग्रीन एमआरटीएस मानांकनानुसार ही स्थानके विकसित केली जातील. येथे एलईडी दिव्यांचा, तसेच ऊर्जास्नेही उपकरणांचा वापर करून वातानुकूल यंत्रणेवरील भार कमी करण्याचा प्रयत्न होईल. ही सर्व स्थानके आणि कारडेपोंमध्ये नैसर्गिक आणि सौरऊर्जेचा वापर होईल.

Web Title: metro station green