मेट्रो रेल्वे मार्गातील ट्रकचा काम पूर्ण, सिडको अधिकारी समाधानी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.   

खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.   

सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वार वर असलेल्या रेल्वे ट्रकवर शंभर मीटर लांबीचा लोखंडी पूल उभारण्यासाठी सिडकोने नऊ डिसेंबरला सहा तासाचा मेगा ब्लॉक घेतला होता. त्यासाठी सहा पाच क्रेन, कामगार, सिडको आणि रेल्वे अधिकारी आदि फौजफाटा तयार केला करण्यात आले होते. मात्र लोखंडी मेट्रो रुळापासून दोन ते तीन इंच पूल बाजूला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने काम बंद करावे लागले होते. मात्र आज विना काम पूर्ण व्हावे यासाठी सिडकोचे मुख्य कार्यकारी अभियंता के के वरखेडकर हे मेट्रो विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारीला घेवून सकाळी नऊ वाजे पासून तळ ठोकून बसले होते. अखेर चारच्या सुमारास रेल्वे ट्रक वरील सत्तावन मीटर पूलचा काम उभारण्यात यशस्वी झाले. 

बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर नवी मुंबई मेट्रो मार्ग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रुळावर धावणे आवश्यक असल्याची सूचना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना दिल्याने, ठाकूर यांनी दोन महिन्यापूर्वी सिडको अधिकाऱ्या समवेत सर्व मेट्रो स्थानकाचा पाहणी दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतल्याने सिडकोकडून मेट्रोच्या मार्गाला गती मिळाली आहे. तळोजा वसाहती समोरील रेल्वे मार्गावर सिमेंट कॉंक्रिटच्या पूल उभारणीस अडथळा येत असल्यामुळे सिडकोकडून रेल्वे ट्रकवर शंभर मीटर लांबीचा स्टीलचा पूल उभारण्यात येणार आहे. त्यातील रेल्वे ट्रकवरील सत्तावन मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन वेळ तीन तासाचा मेघा ब्लॉक घेवून पूर्ण करण्यात येणार आहे.

रेल्वे लाईन वर चौदा हजार टन वजनाचा लोखंडी पूल हा मेट्रो मार्गातील सर्वात मोठा पूल आहे. आज प्रामुख्याने रेल्वे लाईनवरील शंभर मीटर पैकी सत्तावन मीटर लांबीचा महत्त्वाचे पूल उभारण्यात आम्हाला यश आले आहे. रेल्वे ट्रकवरून पुल उभारणीचे काम करताना कोणतेही अडथळा आला नाही. त्यामुळे आज महत्त्वाचे काम झाले. पुढील काम हे ट्रकवर नाही. तरीही दोन वेळा दोन ते तीन तासाचा ब्लॉक घेवून लवकरच काम पूर्ण केले जाईल.
- के के वरखेडकर मुख्य कार्यकारी अभियंता सिडको 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro work on metro rail track, satisfied by CIDCO officials