मेट्रोचे 20 टक्के काम नववर्षात पूर्ण करणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 मार्गाचे 20 टक्के काम नव्या वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोडला आहे.

नव्या वर्षात स्थानकांच्या भिंती बांधण्याची आणि बोगद्यांची खोदकामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर काळबादेवी आणि गिरगाववासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍नही मार्गी लावण्यात येणार आहे.

मेट्रो मार्गाच्या कामासाठी 18 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची बांधकाम कंत्राटे देण्यात आली आहेत. मेट्रोचे भौगोलिक सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. भूगर्भ तपासणीचे काम प्रगतिपथावर असल्याचे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे यांनी सांगितले.

Web Title: metro's 20 percent work in new year