केसरभाई इमारत कोसळलीच नाही!

kesarbai
kesarbai

मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरातील धोकादायक केसरभाई ही इमारत कोसळल्याची बातमी आज सकाळपासून सर्व माध्यमांमधून दाखविण्यात येत होती; मात्र मुळात ही इमारत कोसळलीच नसल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती पण ती सद्यस्थितीत उभी असल्याचे मंडळाच्या वतीने सागण्यात आले आहे. जो इमारतीचा भाग कोसळला तो भाग अनधिकृत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

“डोंगरी येथील 25/C केसरभाई ही उपकरप्राप्त इमारत कोसळलेली नसून आजही सद्यस्थितीत उभी आहे. सदरील  इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याने 2018 साली मंडळाने या इमारतीतील रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देऊन रिकामी करवून घेतली आहे व सद्यस्थितीत ही इमारत सुस्थितीत उभी आहे,” असे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले. 

आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये 25/C केसरभाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे.  सदरील अनधिकृत बांधकाम उपकर प्राप्त नसल्याने म्हाडाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही, असेही म्हाडाने आपल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com