गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघासाठी 'म्हाडा'चा निधी

पायाभूत सुविधांसाठी २१ कोटींचा खर्च
गृहनिर्माण मंत्र्यांच्या मतदारसंघासाठी म्हाडाचा निधी
गृहनिर्माण मंत्र्यांच्या मतदारसंघासाठी म्हाडाचा निधी

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदारसंघात म्हाडाच्या माध्यमातून शौचालये, गटारे, पायवाटा निर्माण करण्यासाठी म्हाडाचा निधी घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाने गृहनिर्माण मंत्र्यांच्या मतदारसंघात २१ कोटींच्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत. तसेच ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे.

ठाणे पालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ६ मार्चपासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे विभागांमधील कामांसाठी निधी मिळणे अशक्य होणार आहे. तसेच शिंदे-आव्हाड वादामुळे विभागात खासदार निधीचा वापर होण्याची शक्यता कमी असल्याने अखेर गृहनिर्माण मंत्र्यांनी मुंब्रा पूर्व विभागात ६ शौचालये, गटर तयार करण्यासाठी म्हाडाच्या कोंकण मंडळाला निधी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंडळाने निविदा जारी केली असून कंत्राटदारांना ११ एप्रिलपर्यंत निविदा भरता येतील.

त्या १८ एप्रिलला उघडण्यात येतील. मतदारसंघातील कामे करण्यासाठी प्रथमच गृहनिर्माण मंत्र्यांनी म्हाडाच्या निधीचा वापर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत कोकण मंडळाचे मुख्याधिकारी नितीन महाजन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, म्हाडा कायद्यात तरतूद आहे, त्यानुसार आम्ही कळवा विभागात पायाभूत सुविधाची कामे करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com