MHADA: धोकादायक इमारतीच्या रहिवाशांना मुंबईतच संक्रमण सदनिका

पहिल्या टप्प्यात 47 रहिवाशांना मिळणार घरे
Mhada
Mhadasakal media

मुंबई : म्हाडाच्या (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने यंदा जाहीर केलेल्या 21 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील (Risky buildings) रहिवाशांना दक्षिण मुंबईतच (north Mumbai) पर्यायी निवासाकरिता 177 गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत 47 रहिवाशांना संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित (society people shifting) करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती , मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर (Vinod ghosalkar) यांनी सोमवारी (ता.2) दिली. (Mhada-Risky buildings-north Mumbai-society shifting-Vinod ghosalkar-nss91)

Mhada
...तर गुन्हा दाखल करु, लोकशाही मार्गाचे प्रवाशांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. यंदाच्या वर्षी 21 इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक 21 इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी रहिवासी आहेत. यापैकी 236 निवासी रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत 47 रहिवाशांना संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित 177 निवासी रहिवाशांना आवश्यकतेनुसार गाळे उपलब्ध करून देण्यात येतील, असे घोसाळकर म्हणाले.

दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशी उपनगरातील संक्रमण शिबिरांत स्थलांतरित होण्यास नकार दर्शवितात. अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता यावी याकरता मंडळाने पुनरार्चित इमारतींतील गाळे उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील माझगाव, ताडदेव , दादर, खेतवाडी, वरळी, न्यू हिंद मिल , इस्त्राईल मोहल्ला अशा अनेक ठिकाणी हे गाळे उपलब्ध असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. तसेच आवश्यकता भासल्यास मुंबई मंडळाकडे मागणी नसलेल्या लहान आकाराच्या सदनिका संक्रमण शिबीर गाळा म्हणून वर्ग करण्याबाबत देखील कार्यवाही करण्यात येईल, असे घोसाळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com