मुंबई : नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक इमारतींची म्हाडाकडून पाहणी

रहिवाशांचा जीव वाचविण्यास म्हाडाचे प्राधान्य
Kamathipura buildings
Kamathipura buildingssakal media

मुंबई : कामाठीपुरा (kamathipura) दोन टाकी परिसरातील मौलाना शौकत अली रोडवरील उपकरप्राप्त उस्मानिया इमारत क्रमांक 160,168 या धोकादायक इमारतीची (Risky building) पाहणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर (vinod ghosalkar) यांनी शुक्रवारी (ता.26) केली. इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्विकास करून रहिवाशांचे जीव वाचविण्यास म्हाडाचे (Mhada) प्राधान्य असल्याचे, घोसाळकर यांनी सांगितले. या इमारतीबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी 1 डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयात बैठक (meeting in mhada) आयोजित करण्यात आली असल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले.

Kamathipura buildings
Anemia Disease : मुंबईसह राज्यातील ५ वर्षांखालील मुलांमध्ये वाढते प्रमाण

इमारत मालक आणि रहिवाशांच्या वादात उस्मानिया इमारत धोकादायक झाल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार इमारतीची अति धोकादायक स्थिती पाहता याचा तातडीने निर्णय व्हावा यासाठी म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांना घोसाळकर यांनी पाहणीसाठी बोलावले होते.

उस्मानिया इमारत तळ अधिक 4 मजल्यांची असून या इमारतीत 32 निवासी भाडेकरू/ रहिवासी वास्तव्यास असून 9 अनिवासी गाळे आहेत. या पाहणी दौऱ्यात विनोद घोसाळकर यांनी इमारतीतील भाडेकरू, रहिवासी, मूळ जागा मालक यांना प्रत्यक्ष भेटून सदर इमारतीच्या तळ व पहिल्या मजल्यावरील कॉलम व बीम धोकादायक स्थितीत असून इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे असल्याचे सांगितले. इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला येणाऱ्या खर्चा व्यतिरिक्त सुमारे 70 लाख रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. सदर अतिरिक्त खर्च मालक व भाडेकरू/रहिवासी यांनी करणे गरजेचे असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

Kamathipura buildings
विधानपरिषद : या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूरची जागा सतेज पाटलांसाठी सोडली!
Mhada Authorities
Mhada Authoritiessakal media

इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी आवश्यक सदर अतिरिक्त खर्च देण्यास मूळ जागा मालक, भाडेकरू/ रहिवासी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत इमारतीच्या दुरुस्तीचे काम रखडणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. इमारतीच्या दुरुस्तीसाठी सदर अतिरिक्त खर्चाबाबत मूळ जागा मालक व भाडेकरू /रहिवासी यांनी तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन घोसाळकर यांनी केले.

धोकादायक स्थितीतील या इमारतीत कुठलीही जीवित व वित्त हानी होऊ नये, याकरिता सदर इमारतीची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. इमारतीच्या दुरुस्ती संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील घोसाळकर यांच्या दालनात 1 डिसेंबर रोजी इमारतीचे मूळ जागा मालक, भाडेकरू /रहिवासी यांची बैठक बोलावली असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com