29 वर्षांपूर्वीच म्हाडाने दिला होता इशारा 

dongri
dongri

मुंबई : डोंगरी येथे कोसळलेली ईमारत बेकायदा असल्याचे पत्र म्हाडाने महापालिकेच्या बी वॉर्डला दिले होते. 1990 मध्ये हे पत्र देण्यात आले होते, तर 2017 मध्ये महापालिकेने मूळ केसरबाई इमारत धोकादायक ठरवून नोटीस पाठवली होती. मात्र तेव्हाही या बेकायदा बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

ही बेकायदा इमारत कोसळून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

या दुर्घटनेनंतर महापालिकेचाा बेदरकार पणा उघड झाला आहे. ही बेकायदा तीन मजली इमारत 1988-89 मध्ये बांधण्यात आली असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले. म्हाडाने या परीसराची पाहाणी केली असता 1990 ही बेकायदा इमारत असल्याचे आढळले. त्यानंतर तत्काळ पालिकेच्या बी प्रभागाला पत्र पाठवून कारवाई करण्याचे सूचना केली होती. मात्र पालिकेने कारवाई केली नाही. त्यामुळेच या 13 जणांचा जीव गेला.

या प्रकरणी आज राज्यसरकाने महत्वाची बैठक बोलवली आहे. तसेच महापालिकेतही धोकादायक इमारतींबाबत बैठक होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com