esakal | म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीची सोडत केली जाहीर !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीची सोडत केली जाहीर !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडाच्या कोकण (Kokan) मंडळाच्या सोडतीमध्ये पंतप्रधान (PM) आवास योजनेतील 6 हजार 180 घरे समाविष्ट आहेत. सध्या ही घरे विविध सुविधांपासून दूर असली तरी येत्या काही वर्षातच या गृहप्रकल्पांभोवती मेट्रो (Metro) , द्रुतगती महामार्गांचे जाळे निर्माण होणार आहे. तर शिरढोण प्रकल्पातून अलिबाग विरार (Virar) द्रुतगती महामार्ग, प्रस्तावित शिरढोण मेट्रो स्टेशन (Metro Station) होणार असल्याने भविष्यात या योजनेला मोठी पसंती येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पाअंतर्गत 8 हजार 984 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर केली आहे. सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 6 हजार 180 घरे समाविष्ट आहेत. शिरढोण येथील 624, खोणी येथील 584, सर्वे क्रमांक 162 खोणी येथे 2016, भंडार्ली 1 हजार 769, गोठेघर येथे 1 हजार 185 अशी एकूण 6 हजार 180 घरांचा समावेश आहे. कल्याण, डोंबविली, तळोजा या परिसरापासून जवळ असलेल्या या योजनांना भविष्यात मोठी लोकप्रियता येणार आहे.

या सोडतीसाठी बुधवार पर्यंत तब्बल 35 हजार अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वसमावेशक योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून पंतप्रधान आवास योजनेला त्याखालोखाल प्रतिसाद मिळत आहे. सुमारे 22 हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. या सोडतीमधील पंतप्रधान आवास योजनेतील घरे आता नागरिकांना दूर वाटत असली तरी येथे भविष्यात येणारे प्रकल्प या परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. शिरढोण प्रकल्पाच्या मध्यभागातून अलिबाग विरार द्रुतगती महामार्ग जाणार आहे. तसेच येथे मेट्रोचे शिरढोण स्टेशन प्रस्तावित असल्याने या भागातील नागरिकांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा: "आदित्य ठाकरे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील!"

पंतप्रधान आवास प्रकल्पाजवळील सुविधा

- अलिबाग विरार द्रुतगती महामार्ग

- डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर कॉर्पोरेशन

- शिरढोणपासून कोकण रेल्वेचे निळजे स्टेशन 20 मिनिटाच्या अंतरावर

- शिरढोण पासून डोंबिवली रेल्वे स्टेशन 30 मिनिटांच्या अंतरावर

- शिरढोणपासून कल्याण रेल्वे स्टेशन 35 मिनिटांच्या अंतरावर

- नवी मुंबई विमानतळ 30 मिनिटांच्या अंतरावर

अलिबाग विरार द्रुतगती महामार्गावरून खालील मार्गावर जाता येणार

- मुंबई दिल्ली महामार्ग

- मुंबई आग्रा महामार्ग

- मुंबई - पुणे जुना महामार्ग

- मुंबई पुणे जुना महामार्ग

- मुंबई गोवा महामार्ग

- जवाहरलाल नेहरू पोर्टकडे

- मुंबई पुणे एक्स्प्रेस वे

- मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग

- मुंबई- वडोदरा- स्पर अलाईनमेंट महामार्ग

हेही वाचा: 'भविष्यात कितीही मोठी लाट आली, तरी आरोग्य यंत्रणा कोलमडणार नाही'

काही लोक म्हाडाच्या गृहप्रकल्पाजवळ पायाभूत सुविधा नसल्याचा प्रचार करत आहेत. वास्तविक म्हाडाच्या प्रकल्पा जवळ विविध पायाभूत सुविधा निर्माण होऊ घातल्या आहेत. भविष्यात नागरिकांना याचा मोठा लाभ होईल. वीज, पाणी, रस्ते, शाळा अशा सुविधा असल्याने या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. नितीन महाजन - मुख्य अधिकारी, कोकण मंडळ

loading image
go to top