मालकीचे घर देण्यासाठी म्हाडाची मास्टर लिस्ट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - कायमस्वरूपी घर मिळू न शकलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील मूळ रहिवाशांकडून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने अर्ज मागवले होते. त्यानुसार म्हाडाने 23 पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली आहे. त्यांना 4 जूनपर्यंत अर्ज करता येतील. 

मंडळाच्या उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांना इमारत पाडण्याच्या सूचना देऊन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही इमारतीचा पुनर्विकास न झालेले आणि जागेअभावी कायमस्वरूपी घर मिळालेले नाही, असे शेकडो रहिवासी असून म्हाडामार्फत त्यांची मास्टर लिस्ट काढण्यात येते. इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने या रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवले असून, ते अनेक वर्षे तिथे राहत आहेत. या रहिवाशांना कायमस्वरूपी गाळा मिळावा यासाठी म्हाडाने अर्ज मागवले होते. या अर्जांची छाननी करून म्हाडाने 2014 मध्ये 323 रहिवाशांना पात्र ठरवले होते. एक हजार 125 अर्जदार अपात्र ठरले होते. या यादीनंतर म्हाडाने मास्टर लिस्टबाबत हरकती व सूचना मागवल्या होत्या. अनेक अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर म्हाडाने ठरवलेल्या धोरणानुसार 240 पैकी समितीने 23 अर्जदारांना पात्र ठरवण्यात आले. गाळ्यांच्या वितरणाची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अद्याप म्हाडाकडून कायमस्वरूपी घर न मिळालेल्या रहिवाशांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. रहिवाशांना 4 जूनपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: MHADA's Master List to Own a Home