#मी_भाजपा_सोडतोय , आता हे कोणी सुरु केलं रे ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

आज सोशल मीडियावर एक नवीन हॅशटॅग व्हायरल होतोय. पाहा काय आहे हा हॅशटॅग

काल काही मराठी कलाकारांकडून एका सिनेमाच्या प्रमोशन साठी #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरला होता. ज्यावरून सर्व मराठी कलाकारांवर कॉंग्रेस पक्षाकडून कडाडून टीका करण्यात आली होती. अशातच आज आणखी एक वेगळा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळालाय. हा हॅशटॅग आहे #मी_भाजपा_सोडतोय. काही लोकं खूप गंभीरतेने या हॅशटॅगचा वापर करतायत, तर अनेकजण फक्त भंकस करण्यासाठी याचा वापर करतायत.  

 

विधानसभेनंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्यात. आता महाराष्ट्रात लवकरच महाशिवआघाडीच्या माध्यमातून नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. अशात मोठ्या प्रमाणावर नेटकरी अशा पद्धतीचे हॅशटॅग वापरून व्यक्त होनता दिसतायत. दरम्यान असे  हॅशटॅग वापरताना कुणावर खासगी टीका तर होत नाही ना ? आणि टीका करण्याची आपण पटली ओलांडत तर नाही ना ? याचं नेटकर्यांनी भान ठेवायला हवं..  

Webtitle : mi bhajapa sodtoy hashtag goes viral on social media


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mi bhajapa sodtoy hashtag goes viral on social media