एमआयडीसीतील कंपनी चालकांचे मोकळ्या जागांवर अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

एमआयडीसीतील कंपनी चालकांनी मोकळ्या जागांवर (मार्जिनल स्पेस) अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी मार्जिनल स्पेससह कंपनीच्या बाहेर असणाऱ्या पदपथावरदेखील अतिक्रमण करून बस्तान मांडले आहे. त्यामुळे पदपथांवरून चालणाऱ्या कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई : एमआयडीसीतील कंपनी चालकांनी मोकळ्या जागांवर (मार्जिनल स्पेस) अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी मार्जिनल स्पेससह कंपनीच्या बाहेर असणाऱ्या पदपथावरदेखील अतिक्रमण करून बस्तान मांडले आहे. त्यामुळे पदपथांवरून चालणाऱ्या कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या बाहेर मोकळ्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवर एमआयडीसीने दोन महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. या कारवाईनंतर कंपनी चालकांनी या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा हा अशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळख जातो. एमआयडीसीमध्ये ाअसणाऱ्या कंपनी चालकांनी कंपनीच्या आवारात कंपनीमधील साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमणाबरोबरच रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या पदपथांवर देखील कंपनीने अतिक्रमण केले आहे. ठाणे-बेलापूर पट्ट्यातील रबाळे, महापे, नेरूळ, शिरवणे अशा सर्वच एमआयडीसी पट्ट्यामधील कंपनी चालक रस्त्यावर अतिक्रमण करत आहे. त्यामुळे या कंपनी चालकांवर कारवाई करण्याची मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

कंपनीच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्या कंपनी चालकांवर दोन महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. मात्र, नव्याने अतिक्रमण केले असल्यास पाहणी करून पुन्हा कारवाई करण्यात येईल.
- यशवंत मेश्राम, उपअभियंता, एमआयडीसी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIDC company operators encroach on open spaces