मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मुंबई - आरामदायी बंबार्डियर लोकलने प्रवास करण्याचे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी त्यांना दिलासा देण्यासाठी सिमेन्सच्या तीन नव्या लोकल लवकरच मुंबईत दाखल होतील.

बंबार्डियरने प्रवास करण्याचे मध्य रेल्वेच्या 40 लाख प्रवाशांचे स्वप्न तांत्रिक अडचणीमुळे भंगले; परंतु मुंबई नागरी वाहतूक टप्पा-2 नुसार मध्य रेल्वेला तीन सिमेन्स लोकल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यापैकी पहिली लोकल 20 डिसेंबरला चेन्नईहून मुंबईकडे येण्यास निघेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बंबार्डियर लोकलसाठी आवश्‍यक असलेली रुळांची रचना व पुलांची उंची पश्‍चिम रेल्वे मार्गावर असल्याने त्या 14 लोकल पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात सामील होतील, तर पश्‍चिम रेल्वेवरील सिमेन्स कंपनीच्या जुन्या लोकल मात्र मध्य रेल्वेला मिळतील.

Web Title: Middle relief train passengers