एमआयईबीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १३ जिल्हा परिषदेच्या शाळांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. 

राज्यातील १३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडल्या गेल्या असून, आज या शाळांची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचे उद्‌घाटन झाले. 

या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या वेळी फडणवीस म्हणाले, की अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीयांना आंतरराष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचे उद्‌घाटन होत असून, ही खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे. 

गेल्या चार वर्षांत शिक्षणाची परिस्थिती सुधारली आहे. शिक्षणामध्ये परिवर्तन झाले आहे. शिक्षण विभागाने केलेल्या लक्षणीय प्रगतीमुळे आज महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: MIEB Rural Student Chance Chief Minister