esakal | मजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले... 
sakal

बोलून बातमी शोधा

मजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले... 

औरंगाबाद जवळच्या करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला.

मजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - औरंगाबाद जवळच्या करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं की, औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.


मुंबईकरांनो सावधान ! कारण ही आकडेवारी पाहून "मुंबईचं काय होणार" असाच प्रश्न उपस्थित होतोय
 


शरद पवारांनी आणखी एक ट्विट केलं आहे. असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं, असं शरद पवारांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली. 

सर्वात मोठी बातमी ! मुंबई पुण्यात चौथा लॉकडाऊन? स्वतः मुख्यमंत्र्यांचे दिलेत संकेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं की, औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीमुळे अत्यंत दुख: होत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी या अपघाता संबंधित बोललो असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य दिले जात आहे. 

सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, औरंगाबाद जवळ करमाड येथे १४ मजूरांचा रेल्वेखाली चिरडून अंत झाला.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.या घटनेने मन सुन्न झाले आहे.माझे आवाहन आहे की गावाच्या ओढीनं धोकादायक प्रवास करु नका.राज्य सरकार तुम्हा सर्वांसोबत आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

मद्यप्रेमींनो खुशखबर ! आता दारुसाठी फटके खाण्याची अजिबात गरज नाही, कारण.. 
 

मजुरांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

migrants losing their lives in the Aurangabad railway accident is heart wrenching says sharad pawar

loading image