नार्वेकरांनी घेतली भुजबळांची भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्याने भुजबळांची शिवसेनेसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भुजबळांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या वेळी ठाकरे यांनी भुजबळांना प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचवले होते. भुजबळ सध्या लीलावती रुग्णालयात दाखल असून, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज त्यांची रुग्णालयात भेट घेतली. या दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली.
Web Title: milind narvekar chhagan bhujbal politics