Milind Narvekar: शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असताना नार्वेकरांचे फोटो आले समोर

milind narvekar news in Marathi
milind narvekar news in Marathi

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हे देखील एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे नार्वेकर सध्या कुठं आहे, याची चर्चा जोरात सुरू होती. मात्र आता नार्वेकर यांचे काही फोटो समोर आले आहे.

milind narvekar news in Marathi
गौप्यस्फोटांना सुरुवात! उद्धव यांना १९९६ मध्येच व्हायचं होतं CM; शिंदे गटाचा खुलासा

सोशल मीडियावर सकाळपासूनच नावर्वेकर शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात मिलिंद नार्वेकर हे तिरुपती येथे गरुड वाहन समारंभात सामील झाले आहेत. त्याचे फोटो नार्वेकर यांनी शेअर केले असून त्यांच्या फोटोत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत आणि राज्याचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी देखील दिसत आहेत.

तत्पूर्वी नार्वेकर शिंदे गटात सामील होणार का, यावर एकनाथ शिंदे यांना देखील विचारण्यात आलं होतं. त्यावर शिंदे यांनी आपल्याला काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं.

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील नार्वेकर यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. पेडणेकर म्हणाल्या होत्या की, नार्वेकर हे शिंदे गटात जातील असं वाटत नाही. शिवसैनिकांना देखील आशा आहे की, ते जाणार नाहीत. ते असं काही करतील, असं कोणालाही वाटत नसल्याचं पेडणेकर यांनी नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com