गिरणी कामगाराच्या कुटुंबातील व्यक्‍तीलाच घर

mhada home
mhada home

मुंबई - राज्य सरकारतर्फे गिरणी कामगारांना देण्यात येणाऱ्या घरांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्‍तींनी अर्ज केले असल्यास पात्र व्यक्तींचे अर्ज बाजूला काढून अन्य अर्ज निकाली काढा, असे निर्देश गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी "म्हाडा'च्या अधिकाऱ्यांना दिले.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी अनेक गिरणी कामगार संघटना गेली अनेक वर्षे "म्हाडा'विरोधात लढा देत आहे. गिरणी कामगारांनी घरे मिळवण्याकरिता आजपर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज करण्यात आले आहेत. "म्हाडा'च्या सोडतीमध्ये एका वर्षात अंदाजे एक हजार घरे उपलब्ध होणार आहेत. सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यास वर्षानुवर्षे कालावधी लागणार असल्याचे राज्यमंत्र्यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून, विधानसभा सदस्य प्रकाश अबिटकर यांनी मंगळवारी (ता.16) राज्यमंत्री वायकर यांच्या समवेत बैठक घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com