गिरणी कामगारांचा बुधवारी इशारा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घर द्यावे, या प्रमुख मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. 25) गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या वतीने इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा बुधवारी दुपारी तीन वाजता काळाचौकी येथील भगतसिंग मैदानातून निघेल आणि त्याची सांगता वरळी येथील डॉ. आंबेडकर मैदानात होईल. मोर्चात आठ गिरणी कामगार संघटनांच्या नेतृत्वाखालील कामगार सहभागी होणार आहेत.

सरकारने गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात गिरणी कामगारांना मोफत आणि मुंबईतच घरे द्यावीत, या मागणीला शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. गिरणी कामगारांच्या आंदोलनात सध्याचे मंत्रीही त्या वेळी सहभागी झाले होते. मात्र, सत्तेत येताच तेही गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

Web Title: Mill workers march on Wednesday