सव्वालाख महिलांचे तपासणार हिमोग्लोबिन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

बदलापूर - येत्या मंगळवार (ता. 15)पासून अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्‍यातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची विनामूल्य तपासणी

शिबिराला सुरुवात होत असल्याची माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली. शिबिरात सव्वालाख महिलांची तपासणी होणार आहे. 

बदलापूर - येत्या मंगळवार (ता. 15)पासून अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्‍यातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची विनामूल्य तपासणी

शिबिराला सुरुवात होत असल्याची माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली. शिबिरात सव्वालाख महिलांची तपासणी होणार आहे. 

ग्रामीण भागात फिरत असताना प्रसूतीदरम्यान महिला दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिमोग्लोबिनचे प्रमाण या घटनांना जबाबदार असल्याचे सांगितले. महिलांना खास करून ग्रामीण भागातील महिलांना याची कल्पना नसते. त्यासाठी गेल्या वर्षापासून ही मोहीम हाती घेतल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी मुरबाड मतदारसंघात म्हणजे अंबरनाथ, कल्याण व मुरबाड या तीन तालुक्‍यांत प्रभावीपणे ही मोहीम राबवली. महिलांमध्ये जागृती निर्माण करणे हासुद्धा या योजनेचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी एक लाख 17 हजार महिलांची तपासणी करण्यात आली. या महिलांना हिमोग्लोबिन वाढावे यासाठी विनामूल्य औषध वाटप करण्यात आले. 

मोहीम राबवण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष करून अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी चांगली मदत केली. त्रुटी दूर करण्यात येऊन यंदाची मोहीम आखली आहे. मंगळवारपासून प्रत्येक गावात शिबिर होणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश पाटील, शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, नगरसेवक किरण भोईर, साकिब गोरे यात सहभागी होणार आहेत.

Web Title: million women inspect HB

टॅग्स