आनंदी आणि आरोग्यमय जीवनासाठी तंदुरुस्त राहा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नेरूळ - आनंदी आणि आरोग्यमय जीवनासाठी तंदुरुस्त राहा, असे आवाहन नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदुर मुंबई कॅम्पस, हार्ट फाऊंडेशन व नेस्ले यांच्या वतीने बेलापूरमध्ये रविवारी (ता. 13) आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या पुरुष गटात ब्रिजलाल शिवशंकर आणि महिला गटात चिंता यादव यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक "सकाळ' आणि "साम' होते. 

मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी पोलिस आयुक्त नगराळे, "सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक नागेश पाटील, संदेश सावंत, बाला सुब्रम्हण्यम्‌, जयकर इलिस, जतीनदीप सेनी, अंकित पटेल, मीनाक्षी गुप्ता आदी उपस्थित होते. 

बेलापूर सेक्‍टर 15 मधील महावीर आयकॉन येथे सकाळपासूनच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जीवनामध्ये आनंदी राहायचे असेल तर सर्वांत प्रथम तंदुरुस्त असायला हवे. शरीरासाठी आपणच वेळ देऊन नियमित व्यायाम केला पाहिजे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. महावीर आयकॉन, लक्ष्मी हॉटेल, सकाळ भवन मार्ग, विहार सरोवर मार्गे पुन्हा सेक्‍टर 15 अशी सहा किलोमीटरची ही मिनी मॅरेथॉन होती. स्पर्धेपूर्वी सुचिता पॉल यांच्यासमवेत झुम्बा नृत्यात स्पर्धकांनी ठेका धरला. आयआयएम इंदुर मुंबई कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी खारघर, वाशी, बेलापूर येथे फ्लॅश मॉब करून मिनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी जनजागृती केली होती. हजारो विद्यार्थी व नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्यांना एकूण दोन लाखांची बक्षिसे दिली, अशी माहिती हार्ट फाऊंडेशनचे जयकर एलियस यांनी दिली. 

स्पर्धेतील विजेते 

पुरुष गट 

1) ब्रिजलाल शिवशंकर 

2) शेषनाथ चव्हाण 

3) सुजित गमरे 

4) संजय झाकणे 

5) शशिकुमार दिवाकर 

महिला गट 

1) चिंता यादव 

2) सुप्रिया माळी 

3) हीना माळी 

4) श्रुतेजा सकपाळ 

5) प्रतीक्षा कुलये

Web Title: Mini Marathon Championships