‘मीनी सी-शोअर’ धोकादायक

‘मीनी सी-शोअर’ धोकादायक

तुर्भे - खाडी-तलावात पोहण्यास मनाई करणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत; मात्र त्याकडे कानाडोळा करण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. वाशीतील अतिशय गजबजलेल्या मिनी सी-शोअर येथील तलावात तर नियम धाब्यावर बसवून पोहणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

मीनी सी-शोअरमध्ये पोहण्यास मनाई आदेश आहे. त्यानंतरही अल्पवयीन मुले सर्रास पाण्यात उतरतात. महापालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. एक पोलिस निवारा केंद्रही आहे. मात्र तेथे कर्मचारी हजर नसतात. निवारा केंद्र फक्त शोभेची वस्तू झाली आहे. 

काही हौशी तरुण-तरुणी सेल्फीच्या नादात सर्रास या तलावात जीव धोक्‍यात घालून उतरतात. त्यामुळेही चिंता व्यक्त होत आहे.

वाशी मीनी सी-शोअर येथे महापालिकेच्या वतीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षक कर्तव्यात कसूर करत असतील तर त्यांना समज देण्यात येईल.
- दिवाकर समेळ, विभाग अधिकारी, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com